नितीनजी गडकरी म्‍हणजे विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा

आमचा जिल्हा

नितीन गडकरी हे नांव उच्‍चारताच एक अलौकीक ऊर्जा मिळते, लोककार्यासाठी आगळे बळ मिळते. विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा म्‍हणजे नितीनजी गडकरी. काश्‍मीरपासून कन्‍याकुमारीपर्यंत अवघ्‍या भारताने त्‍यांच्‍या विकासाचा झंझावात अनुभवला आहे. कोरोना काळातही सर्वसामान्‍य जनतेने त्‍यांचे सेवाकार्य अनुभवले आहे. ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर असो रेमिडीसीवीर इंजेक्‍शन असो, एनआयव्‍ही, मोठे व्‍हेंटीलेटर अशा विविध आवश्‍यक उपकरणांचा पुरवठा करून त्‍यांनी जनतेला मोठी मदत केली आहे. विकासाची दुरदृष्‍टी लाभलेल्‍या या लोकनेत्‍याच्‍या निरामय दीर्घायुष्‍य लाभो.
कार्यकर्त्‍यांवर आभाळमाया करणा-या नितीनजींना ऊर्जा आणि बळ मिळो हीच सदिच्छा.