चंद्रपूर –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती यावर्षी साजरी करण्यात येणार आहे.
बुद्धी,चातुर्य व पराक्रम तसेच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा कसा होऊ शकतो व ज्याच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला गेला आहे,अश्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन,सामाजिक एकात्मता,स्त्री-पुरुष समानता, गोर-गरिबा विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे निर्मूलन,अनिष्ट चालीरीती व रूढी परंपरा बिमोड अहिल्यादेवी होळकर यांनी केला.
सातबारा ची कार्यप्रणाली महसूल विभागामध्ये कार्यान्वित करून आपल्या दैनंदिन व्यवहारात प्रचलित आणणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही युवा पिढी करीता एक आदर्श मानले जाते.
त्यांचा प्रचार व प्रसार विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून 31 मे 2024 ते 31 मे 2025 पर्यंत सेवा वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समारोह नागरि समिती चे गठन सार्वजनिक बैठकीद्वारे करण्यात आले. या संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या या जयंती महोत्सवाच्या नागरि समिती चे अध्यक्ष म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे तर संयोजक म्हणून गजानन शेळके सचिव सुनील पोराटे उपाध्यक्ष घनश्याम दरबार,साईनाथ बूच्चे , सौ. रती संदीप पोशेट्टीवार कोषाध्यक्ष निलेश काळे सहकोशाध्यक्ष डॉ. यशवंत कन्नमवार तर
सदस्य म्हणून रवीजी भागवत,वसंतराव थोटे,सुहास दानी,संजय दाणेकर,डॉ. अशोक जीवतोडे, डॉ. अंजली हस्तक,डॉ.राजेश इंगोले,सौ. जयश्री कापसे,डॉ. जयेश चक्रवती,चमकोर सिंग लड्डी,राजेश्वर आलूरवार,राजेंद्र गांधी, डॉ. स्मिता जीवतोडे,हरीश कुमार अग्रवाल,दिवाकर थोटे,महेश देवकते,वासुदेव आस्कर, हेमंत ढोले, ज्योती दरेकर,डॉ. तुषार मार्लावार,कैलास उराडे, कल्पना पालीकुंडवार,सौ.प्रज्ञा मदनकर,अश्विनी खोब्रागडे, डॉक्टर दीपक भट्टाचार्य, पवन ढवळे, प्रवीण उरकुडे,प्रवीण गिलबिले,मयूर भोकरे
असे या पत्रकाद्वारे प्रसिद्धी प्रमुख संजय रामगिरवार व कपिष उजगावकर यांनी कळविले आहे.
अशा या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्यातील सर्व समाजातील नागरिकांनी उस्फुर्त पणे सहभागी होण्याचे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.