मनाचे श्लोक!
काकांचे “मनाचे श्लोक” ऐकून आश्चर्य नाही तर पुन्हा एकदा घृणा वाटली… कशात काही नसताना समाजात तेढ निर्माण करण्यासाठी छोटेशे पिल्लू सोडून द्यायचे आणि राज्यातील जनतेत संभ्रमाचे आणि द्वेष पसरविण्याचे घाणेरडे राजकरण करायचे ही “खोड” काकांची केव्हा जाईल माहित नाही.
कालपरवा ते कुठेतरी बोलले कि “राज्यात मनाचे श्लोक, गीता आणि मनुस्मृती चे श्लोक शिक्षणात येणार असे कानावर आले” ( म्हणून पिल्लू सोडले असा शब्द वापरला.) अहो काय संबंध आता हा विषय बोलण्याची? कुणाच्याही डोक्यात असा विचार नाही, आम्हालाही माहितही नाही असे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगूनही टाकले.. तरीही या मुद्यावरून पुन्हा कोणत्या तरी समाजाला, विशिष्ट वर्गाला टार्गेट करायचे, जातीबद्दल बोलणाऱ्यांना मोकळे रान उपलब्ध करून दयायचे आणि स्वतः नामानीराळे राहायचे.. ही जुनी खोड 80 पार केल्यानंतरही जपणारे काका कधी सुधरतील माहित नाही!
अहो, नका शिकू जगण्याची कला आणि शिस्त मनाच्या श्लोकातून कुणाचं वाईट होणार आहे?
जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे | मना त्वाची रे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले | देहे त्यागीता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी |
जर समजा कुणी शिकवतही असेल हे, तर कोणत्या पालकाला वाटणार नाही कि माझ्या मुलाने असे शिकू नये? यातून कुणाचा अपमान होतो का, कुणाबद्दल द्वेष तयार होतो का? जे चांगलं आहे त्याचं करा कौतुक, भांडणे लावण्यापेक्षा! जरा विचार करा बाबा, राजकारणासाठी हे लोक काहीही करू शकतात…
*नितीन कुळकर्णी