अभ्यासिकेतून ज्ञानवंत घडतील : संत सचिन देव
सुशीला प्रभाकर वाडेकर अभ्यासिकेचे थाटात लोकार्पण
अमरावती, 23 जून
श्री संत अच्युत महाराजांच्या आशीर्वादाने वाडेकर बंधू यशवंत झाले. महाराजांचेच कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी गावातल्या विद्यार्थ्यांसाठी आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ सुसज्ज अभ्यासिका उभारली. येथून ज्ञानवंत घडतील आणि ते समाजाची सेवा करतील, असा विश्वास संत सचिन देव महाराज यांनी व्यक्त केला.
ग्रामीण विकास सत्संग मंडळ संचालित सावित्रीबाई फुले वाचनालय, शेंदूरजना बाजार, ता. तिवसा येथे मनोज वाडेकर यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या स्व. सौ. सुशीला प्रभाकर वाडेकर स्मृती अभ्यासिकेचे रविवार, 23 जून रोजी लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामीण विकास सत्संग मंडळ, शेंदूरजना बाजारचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर तर प्रमुख अतिथी म्हणून श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ. श्रीकांत देशमुख, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे सहा. सल्लागार मनोज वाडेकर, शेंदूरजना बाजारच्या पोलिस पाटील शितल युवराज भोजने उपस्थित होत्या. सर्वप्रथम कोनशिलेचे अनावरण करत फित कापून अभ्यासिकेचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. अभ्यासिकेच्या बांधकामाचे नियोजन करणारे प्रकाश देशमुख, कंत्राटदार चंद्रकांत उंबरकर, इलेक्ट्रिशन निखिल टेंभरे, माजी ग्रंथपाल श्रीराम सावरकर, ग्रंथपाल पवन भोजने यांना अथितींच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. दत्तात्रय, मुरलीधर, मनोज वाडेकर या तीन बंधूंचा सेवकार्यासाठी सपत्नीक सत्कार मान्यवरांनी केला. ज्ञानेश्वर बोडखे, भास्कर बोडखे, राजेंद्र देवळे, मंजुषा देवळे यांनी स्वागत केले. महाराजांच्या कार्याला साजेशी अभ्यासिका वाडेकर कुटुंबीयांनी उभारल्याचे गौरव उदगार डॉ. अनिल सावरकर यांनी काढले. अन्य अथितींनी आपल्या मनोगतातून अभ्यासिकेची प्रशंसा केली. प्रास्ताविकातून नारायण बोडखे यांनी गावात आजपर्यंत झालेल्या कार्याची माहिती दिली. संचालन प्राजक्ता राऊत तर आभार वामनराव भोजने यांनी मानले. कार्यक्रमाला संत अच्युत महाराज परिवारातील गावोगावची भक्त मंडळी मोठ्या संख्येने हजर होती. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.