एडवोकेट बेलोकार यांचे निधन वेदनादायी
मंगरूळनाथ तालुक्यासह पंचक्रोशीत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक सहृदयी माणूस म्हणून अॅडव्होकेट मा. गो. बेलोकार सुपरिचित होते. विशेषता दलप्रभा आणि कुळकर्णी परिवाराशी त्यांचा ऋणानुबंध अनेक वर्ष होताच. राजकीय क्षेत्रामध्ये अजातशत्रू माणूस म्हणून ओळखले जाणारे ऍड. बेलोकार यांच्या निधनामुळे एक सुसंस्कारित सामाजिक कार्यकर्ता हरवल्याचे दुःख आहे. दलप्रभा परिवाराच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली.
अॅड. बेलोकार यांच्या बद्दल ज्येष्ठ पत्रकार व दलप्रभा परिवारातील एक सन्माननीय सदस्य श्री अरुण कुमारजी इंगळे यांनी व्यक्त केलेल्या भावना…
” साधारणतः 1965 66 चा काळ असेल तर काळात कायदेविषयक क्षेत्रात मंगरूळपीर शहरात एडवोकेट यूपी लांडे नानासाहेब कुलकर्णी नानासाहेब देशमुख आरसी बंग आर एम जाकोठीया पीआर खपलीही वकील मंडळी काम करायची त्यावेळेस केवळ एक कनिष्ठ दिवाणी न्यायालय या भागाची गरज म्हणून पुरेसे होते मात्र पुढे जसजसा कामाचा व्याप वाढला तसेच या क्षेत्रात नवीन नवीन लोक कार्यरत झाले त्यात नव्या जोमाने एस एस ढेगाळे जी बी राठी आर एस दुबे एमजी बेलोकार ही मंडळी नव्याने दाखल झाली नव्या जोमाने काम करत असताना या मंडळीपैकी एडवोकेट एमजी बेलोकार यांनी केवळ कायदेविषयक क्षेत्रच आपल्या कामासाठी पुरेसं मानता एक सेवा कार्य म्हणून सहकार क्षेत्र अंगीकारलं आणि सर्वप्रथम मंगरूळपीर शहरात सहकार क्षेत्रातील मंगरूळपीर सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेची स्थापना करून एक नवा उद्योग या शहरात विकसित करण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून अनेक मजुरांच्या हातांना काम मिळालेशिवाय त्यातून नवनवीन उद्योग सुरू करण्याची कल्पना त्यांनी अमलात आणण्याचा बराच प्रयत्न केला परंतु पुढे राजकीय स्पर्धेच्या युगात त्यात ते टिकू शकले नाहीत तरीही त्यांनी प्रामाणिकतेची व सचोटीची कास कधीच सोडली नाही आपले कार्यक्षेत्र त्यांनी व्यापक करण्याचा बराच प्रयत्न केला अकोला जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील नामवंत सहकार नेतृत्वाची या कामी त्यांना बरीच साथ मिळाली ज्यात अण्णासाहेब कोरपे चे नाव अग्रक्रमाने घेता येईल कायदेविषयक तसेच सामाजिक क्षेत्रात सेवा क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपला बराचसा ठसा उमटवला ज्यात विधीज्ञ क्षत्रात ते मंगरूळपीर बार कौन्सिलचे अध्यक्ष राहिलेत
त्याचबरोबर शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहेत्यांच्या प्रामाणिकतेचा व लोकप्रियतेचा वसा घेऊन त्यांच्या पत्नी सौ आशा बेलोकर यादेखील मंगरूपीर नगरपरिषदेत सदस्य म्हणून राहिल्या
सामाजिक क्षेत्रात त्यांचं कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून समाजात गावात ओळखल्या जात होतं कोळंबी या गावातून येऊन त्यांनी मंगरूळपीर मध्ये आपल्या कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धतीचा धडा गिरवला ज्याचा आजही समाजात नाव काढले जाते आपले 80 वर्षाच्या आयुष्यात कधीही कोणाचेही मन न दुखवता केवळ प्रामाणिकता धार्मिकता अध्यात्मिकता यांची जोड घेऊन त्यांनी मार्ग व्यक्तीक केला
आज आपले ऐंशी वर्षाचे आयुष्य पूर्ण करून त्यांनी इहलोकांतून मोक्षाचा रस्ता स्वीकारला आज रात्री त्यांना वृद्धापकाळ व आजारपण यामुळेया पृथ्वीतलावरील आपली कारकीर्द संपुष्टात आणावी लागली
अशा या महान लोकनेत्यास सहकार नेत्यास प्रभावी विधीवंतास माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
शेवटी एवढेच म्हणावसं वाटते की
दोन ओंदक्याची होते सागरात गाठ
एक लाटतोडी पुन्हा ना भेट
क्षणिक आहे तेही मेळ माणसाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.. “