टाळ मृदूंगाच्या गजरात चिमुकल्यांची साक्षरतेची दिंडी
माइंड्स आय इंग्लिश स्कूलचा उपक्रम
वाशिम – ज्ञानोबा माऊली तुकाराम,जय जय रामकृष्ण हरी असा टाळमृदुंगाच्या गजरात माऊलीच्या नावाचा गजर करत चरखा लेआऊट येथील माइंड्स आय इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त साक्षरतेची दिंडी साकारली. इयत्ता पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मिळून गळ्यामध्ये टाळ, मृदंगाची साथ, वारकर्यांच्या पोशाखात सर्वजण नटुन, सुंदर सजावटीतील पालखी, विठ्ठल रुक्मिनी अवतारातील मुले, भगव्या पताका हातामध्ये घेऊन हरी नामाचा गजर करत शाळेपासून आषाढी वारीचा दिंडी सोहळा सुरु करण्यात आला. आणि वाजतगाजत,नाचत गावातून दिंडीत शिक्षकांसह, पालक, महिला सहभागी झाले होते. जणु काही आषाढीवारीला गेल्याचा अनुभव येत होता. सर्वजणांनी आषाढी वारीचा आनंद घेतला. यावेळी संस्थाचालक उषा मापारी, मुख्याध्यापिका चंचल शेवलकर, शिक्षकवृंद भारती धामणकर, दीपाली हजारे, सुषमा ठाकरे, श्याम दवणे, सुजाता भांदुर्गे, अरुणा जुनघरे, अर्चना भुसारी, शशी विश्वकर्मा, नीता मराळे, प्रार्थना घोडेस्वार, माया मापारी, रूपाली राऊत आदी दिंडीत सहभागी झाले होते.