मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

आमचा जिल्हा

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकदिवशीय धरणे आंदोलन
अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचा पुढाकार : अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त आयोजन
वाशिम – मातंग समाजाच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त संघर्ष दिन म्हणून अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या आयोजनातून गुरुवार, १८ जुलै रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन ठेवण्यात आले आहे. याबाबत संघटनेच्या वतीने १० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांतीसेनेचे अध्यक्ष प्रा. संजय जामठीकर हे करतील. मोर्चाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे प्रदेश उपाध्यक्ष भागवतराव डोंगरे, विदर्भ मार्गदर्शक गजाननदादा खंदारे, विदर्भ संघटक भारत अंभोरे, सामाजीक कार्यकर्ते विजय लोंढे, नारायण डाखोरे, प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जि.प. सदस्य शंकरराव दाभाडे, अनिल कांबळे, सामाजीक कार्यकर्ते पुंडलीकराव गवळी, बाळासाहेब जोगदंड यांची उपस्थिती राहील.
धरणे आंदोलनाच्या मागण्यांमध्ये, अनुसुचित जातीच्या आरक्षणाची वर्गवारी करुन मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, क्रांतीगुरु लहुजी साळवे अभ्यास आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करावी, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथील स्मारकाचे काम तात्काळ सुरु करावे, डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, वाशिम येथील अकोला नाका चौकातील जागेवर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे, ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण केलेल्या गायरान धारकाच्या नावे पट्टे देण्यात यावे, ई-क्लास जागेवर घर असलेल्या लाभार्थ्यांच्या जागेच्या ८ अ वरुन सरकार हे नाव काढून मालकीचे नावाने त्यांची नोंद घ्यावी यावी या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या धरणे आंदोलनात जिल्हयातील मातंग समाजबांधवांनी बहूसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद लगड, युवा जिल्हाध्यक्ष अभिषेक लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, जिल्हासचिव भास्कर जाधव, जिल्हा संघटक विलास खंदारे, गजानन गायकवाड, जिल्हा प्रवक्ता दिलीप जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन झोंबाडे, जिल्हा संपर्कप्रमुख विनोद आवारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद डोंगरे, जिल्हा मार्गदर्शक भानुदास लांगडे, वाशिम तालुकाध्यक्ष शंकर गवळी, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष सुखदेव झोंबाडे, तालुका उपाध्यक्ष कडुजी खडसे, रिसोड तालुकाध्यक्ष प्रदीप अंभोंरे, मालेगाव तालुकाध्यक्ष परमेश्वर खंदारे, सोशल मिडीया अध्यक्ष देवा गवळी, महिला जिल्हाध्यक्ष शांताबाई गायकवाड, युवा महिला जिल्हाध्यक्ष शोभनाताई साळवे आदींनी केले आहे.