मुंबई, दि २ डिसेंबर : देशात सदस्यता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश मुख्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, माधवी नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. देशात यापूर्वीच सदस्यता अभियानाची सुरुवात झाली होती पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रात अभियान राबविण्यात आलं नव्हतं. आता विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला आहे.
मिस कॉलद्वारे मिळवा मेंबरशिप
तुम्हालाही भाजपचे सदस्यत्व मिळवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या फोनवरून 8800002024 या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल करावा लागेल. मिस कॉल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये सदस्यत्व क्रमांक दिला जाईल.