मालेगाव, ता. ७ : वाशीम जिल्ह्यातील ना. ना. मुंदडा विद्यालय, मालेगावच्या १९८८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी ३६ वर्षांनंतर एका विशेष “कृतार्थ सोहळ्या”च्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहाने करण्यात आले असून, येत्या १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून युवक दिनी हे जुने मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणार आहेत.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळातील शिक्षकांचा “हृदय सत्कार” करण्यात येणार आहे. दिवसभर विविध सांस्कृतिक, मनोरंजक कार्यक्रम आणि जुन्या आठवणींना उजाळा देत धमाल मस्ती करण्यात येईल.
सदर सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश मुंदडा, नितीन कुळकर्णी, शैलेश भुतडा, डॉ. किशोर काबरा, गजानन पाटील, किशोर लाहोटी, सुखदेव बळी, गोविंद वर्मा, उदय देशमुख, लक्ष्मी पुरोहित-परिख, वर्षा मुंदडा-मालपाणी, विशाल शेलगावकर, दीपाली लाहोटी-भुतडा, अनिल गट्टाणी, रमेश बळी, अतुल भांडेकर, विठ्ठल काबरा, गजानन बळी, राधेश्याम घुगे, संजय त्रिवेदी, किशोर द्वारकादासजी काबरा यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी काम करीत आहेत.
हा अनोखा सोहळा केवळ आठवणींच्या पूल बांधण्यासाठीच नव्हे तर जुन्या नात्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे.