नवी दिल्ली दि.27 ~
दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ हे जागतिक दर्जाचे महाकवी होते.क्रांतिकारी साहित्यिक होते.त्यांनी आपल्या काव्यातून लेखनातून क्रांती घडवली आहे.क्रांतीची प्रेरणा देणारे त्यांचे साहित्य अजरामर आहे. त्यांना ओळखत नाही म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या त्या सदस्यांना त्वरित निलंबित केले पाहिजे आणि नामदेव ढसाळ यांच्यावरील हल्ला बोल या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र तात्काळ दिले पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली. सेन्सॉर बोर्डाच्या ज्या सदस्यांनी नामदेव ढसाळ यांना ओळखत नसल्याचे सांगत दलित चळवळीवरील सिनेमा ला प्रमाणपत्र देण्यास विरोध केला त्यांचा आपण निषेध करीत असून त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे असे आपले मत असल्याचे सांगत झालेल्या प्रकरणाचा ना.रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केला आहे.
दलितांवरील अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी दलित साहित्या सोबत दलित पँथर या संघटनेची स्थापना करून नामदेव ढसाळ यांनी क्रांती घडवली आहे.त्यांना ओळखत नाही म्हणणारे सेन्सॉर बोर्डाचे दलोतद्रोही सदस्य निलंबित झाले पाहिजे.अशा मनोवृत्तीच्या लोकांना सेन्सॉर बोर्डात ठेवता कामा नये.नामदेव ढसाळ यांच्यावरील सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे.चळवळीवरील हा सिनेमा प्रदर्शित होऊन जनमानसात पोहोचला पाहिजे.असे ना. रामदास आठवले म्हणाले.