ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 54 वसतिगृहे सुरु ; मुख्यमंत्र्याकडून मंत्री अतुल सावे यांचे कौतुक

Uncategorized

मुंबई, दि. 5 : वरळी येथील शासकीय दुग्धशाळा वसाहतीतील इमारतींचे संरचनात्मक परीक्षण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वरळी यांचेमार्फत करण्यात आले असून, त्यानुसार इमारतींच्या देखभाल दुरूस्तीकरिता व धोकादायक पाण्याची टाकी निष्कासित करण्यात आले आहे. दुरूस्तीची कामे सुरु असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषद सदस्य सुनिल शिंदे, मिलिंद नार्वेकर यांनी वरळी दुग्धशाळा वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

दुग्धविकास मंत्री श्री. सावे म्हणाले, दुग्धशाळेतील कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्याबाबत शासनाचे कोणतेही धोरण नसून वरळी वसाहतीतील इमारती कमकुवत झाल्याने इमारतीतील कर्मचाऱ्यांना पर्यायी सोय म्हणून वरळी येथील उपलब्ध असलेल्या पर्यवेक्षीय तसेच कामगार वसाहतीतील शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.