आमच्याबद्दल

जुलै 1974 मध्ये वाशिम जिल्ह्यातील मालेगाव या छोट्याशा गावातून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि लोकप्रिय शिक्षक असलेल्या कै. वसंतराव कुळकर्णी यांनी साप्ताहिक दलप्रभा या वर्तमानपत्राची मुहूर्तमेढ रोवली. नाट्य, कला, संस्कृती, राजकारण आणि समाजकारणाची नितांत आवड असलेल्या कै. वसंतराव कुलकर्णी यांनी समाज प्रबोधन, ग्रामीण विकास आणि राष्ट्र विकास या उदात्त भावनेने दलप्रभाच्या माध्यमातून शेवटच्या श्वासापर्यंत लोकसेवा केली.
मालेगाव सारख्या छोट्याशा गावात स्वकर्तुत्वाने मोठ्या झालेल्या लोकांना, हक्काचे व्यासपीठ म्हणून दलप्रभा उपलब्ध करून दिले. गावातल्या होतकरू आणि हुशार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा पायंडा दलप्रभा पुरस्कार देऊन त्याकाळी वसंतराव कुलकर्णी यांनी पाडला.
उत्तम भाषणशैली, सुवाच्च हस्तलेखन आणि उत्तम चित्रकार असलेल्या कै वसंतराव कुळकर्णी वाशिम, अकोला, बुलढाणा सह विदर्भातील ग्रामीण पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा उमटविला होता. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष, वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अशा विविध पदांना न्याय देत त्यांनी दलप्रभाच्या माध्यमातून ग्रामीण पत्रकार घडविले.
दलप्रभा ला आता पन्नास वर्षे पूर्ण होऊ घातली आहेत. त्यानिमित्ताने दलप्रभा आता जागतिक पातळीवर अर्थात डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणताना आम्हाला विशेष आनंद होतोय. दलप्रभाच्या या यशस्वी प्रवासात ज्यांनी आमची साथ केली, सोबत केली, आमच्या परिवारावर नितांत प्रेम आणि श्रद्धा ठेवली त्यांचे आम्ही आभारी आहोत. स्पर्धेच्या या युगात टिकण्यासाठी दलप्रभा डिजिटल भावा अशी अनेक हितचिंतकांची इच्छा होती. त्यांच्या प्रेमाचा सन्मान करत, आज दलप्रभा डिजिटल करताना आम्हाला विशेष आनंदाने समाधान होत आहे.

आपले प्रेम, स्नेह, सदिच्छा, सूचना यापुढे देखील अशाच सोबत राहतील अशी खात्री आहे.

संस्थापक संपादक :
कै. वसंतराव अनंतराव कुळकर्णी

संपादक :
नितीनकुमार वसंतराव कुळकर्णी

कार्यकारी संपादक :
सौ. जयश्री नितीनकुमार कुळकर्णी

सहयोगी संपादक :
अविनाश कुळकर्णी
ऍड. अमेय माधव मोतलग

कार्यालय :
टी-3, प्लॉट नं. 94, निर्माण मॅनोर, द्वारकापुरी, गल्ली नं 1, नागपूर -27

ईमेल : dalprabha2015@gmail.com

संपर्क क्र :
+91 8087355583

+ 91 7507786943