जात जाता जात नाही !
भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील जातीपातीच्या राजकारणाचा संबंध प्रत्येक ठिकाणी जोडला जातोय प्रत्येक वेळी निवडणूक जाहीर झाली की उमेदवार ठरवताना त्या उमेदवाराचे समाजकार्य त्याची बुद्धिमत्ता याचा विचार नंतर होतो सगळ्यात आधी त्यांचे जातीय समिकरणाची समीक्षा होऊन उमेदवारी ठरते ही भारतीय लोकशाही साठी अत्यन्त घातक बाब आहे
अमुक मतदार संघात तमुक जातीचा शेकडा किती आहे त्याला जोडून मतदान करणाऱ्या जाती किती आहेत याबद्दलची आकडेवारी नक्की करून व पक्षनिष्ठ मतदारांची संख्या बघूनच प्रत्येक पक्ष आपला उमेदवार ठरवतो
भारतीय जनता पक्षाने सुद्धा हे तत्व जे खरे तर त्यांच्या हिंदुत्व व राष्ट्रवादी तत्वात न बसणारे आहे पण नाईलाजाने का होईना आत्मसात केले आहे
लहान सहान जातींच्या समूहाचे ज्यांचा प्रभाव २ किंवा ३ मतदारसंघात आहे अशा नेत्यांना सामावून घेण्यात बिहार उत्तर प्रदेश तामिळनाडू कर्नाटक या प्रदेशात त्यांच्यासाठी १ ते ४जागा सोडून सत्ता स्थापन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या भाषणात सतत ओबीसी व इतर मागासवर्गीय जातींचा उल्लेख करून काँग्रेस ने कसे ह्या सर्वांनाच वापरून घेतले व त्यांना मागासच ठेवले इतकी वर्षे हे समजावून सांगताना भाजप ने आपल्या १० वर्षात ह्या गरीब व मागासवर्गीय समूहाला कसा न्याय मिळवून दिला हे लक्षात आणून देतात
विकासात्मक राष्ट्रवादी सबका साथ सबका विश्वास व सबका विकास हा नारा असणाऱ्या भाजप ला सुद्धा हिंदू म्हणून समस्त हिंदूंना एकत्र आणण्यात अजूनही यश मिळाले नाही ही भारतीय राजकारणातील शोकांतिका आहे काँग्रेस ने पेरलेले जातीयतेचे विष संपवणे हे मोठे आव्हान आहे
ह्याउलट मुस्लिम समाजात अनेक जाती असताना तेथे मात्र जातीवादाचा लवलेशही दिसत नाही भलेही मोदींच्या सगळ्या सरकारी अनुदानित योजनांचा लाभ सगळ्या धर्मातील जातीतील लोकांना मिळतोय पण निवडणूक आली की बहुतांश मुस्लिम मतदार काँग्रेस किंवा इतर भाजप विरोधी पक्षांची तळी उचलतात व त्याच वेळी हिंदू मात्र जातीपातीच्या विळख्यात अडकून भाजप ला दूर सारतात आणि ह्याच मुळे कदाचित भाजप ने नवे तंत्र विकसित केले व जातीचे भक्कम समीकरण असणारे उमेदवार द्यायला सुरुवात केली व ते त्यात यशस्वी होताना दिसत आहे शेवटी आपली धोरणे आपले विचार राबवण्यासाठी सत्ता ही महत्वाची असते त्यासाठी निवडणूक हाच एक उत्तम उपाय लोकशाही त असतो
हे सर्व जरी खरे असले तरी भारतीय मानसिकता बदलणे आवश्यक आहे जाती पातीच्या ह्या लढाईत भारतीय संस्कृती व राष्ट्रवाद मात्र भरडला जातोय
शेवटी हेच खरे
जात जाता जात नाही !