कारंजाचा “तिर्थक्षेत्र व पर्यटन आराखडा” तयार करून,भावी आमदार,व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणार काय ?

आमचा जिल्हा

कारंजाचा “तिर्थक्षेत्र व पर्यटन आराखडा” तयार करून,भावी आमदार,व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणार काय ?

कारंजा (लाड) : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे,अनेक हौस्या गवस्या नवस्या नेत्यांनी मतदार संघामध्ये जनसंवाद वाढविलेला आहे.मात्र दुदैव असे की,यामध्ये स्थानिकापेक्षा बाहेरच्या पाहुण्या उमेद्वारांचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.बाहेरच्या अनेक धनाढ्यांनी व इच्छुकांनी तर कारंजा तालुक्याशी काडीचाही संबंध नसतांना सुद्धा,येथील आमदारकीवर डोळा ठेवला आहे. कारंजा शहराला स्वतःची जहाँगीर समजून त्यांनी,येथे त्यांच्या तात्पुरत्या निवासाकरीता आणि प्रचार यंत्रणा राबविण्याकरीता,बंगला वजा घरे देखील भाड्याने घेतलेली आहेत. (आणि ही भावी आमदार पाहुणे मंडळी फक्त निवडणूकापुरती कारंजा शहरात तळ ठोकून राहणार आहेत.निवडणूक होताच मात्र आपला बेड बिस्तरा बांधून ते स्वगृही परतणार आहेत.) आता महत्वाचा प्रश्न असा आहे की,कारंजा मानोरा मतदार संघाच्या जनसमस्यांची यांना काही जाण ( माहिती ) तरी आहे काय ? येथील मतदारांच्या समस्या सोडविण्याकरीता खरोखर हे आमदारकीचे उमेद्वार पाहुणे सक्षम आहेत काय ? ; सध्या कारंजा मानोरा मतदार संघाची शोकांतिका म्हणजे, हा मतदार संघ सर्वार्थाने विकासापासून वंचित राहिलेला आहे.येथील शेतकरी राजाकरीता शेतीच्या ओलीताची किंवा सिंचनाची कोणतीच सोय नाही.शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही.शेतकऱ्यांना नव्याने कर्जपुरवठा होता नाही.शेतकऱ्याकरीता येथे,केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पुरातन आणि पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती असूनही,शेतकऱ्यांचे शेतीमालावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आणि उद्योग धंदे कारखाने नाहीत.शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय म्हणून उच्च महाविद्यालये आणि मागासवर्गीयांच्या मुलांकरीता शासकिय सामाजिक न्याय भवन नाही.मजूर कामगारांच्या,आय.टी.आय. किंवा अभियांत्रीकी झालेल्या सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या अवाढव्य वाढूनही त्यांच्या रोजगार व्यवसायाची कोणतीच व्यवस्था नाही.धंदा व्यवसायाकरीता येथील बँका कर्जपुरवठा करीत नाहीत.त्यामुळे प्रचंड प्रमाणात येथे बेकारी आहे.कारंजा शहर हे समृद्धी महामार्ग आणि चार जिल्ह्याचा केन्द्रबिंदू असतांनाही येथे औद्योगीक वसाहत झालेली नाही. येथील मतदार निवडणूकांबद्दल कमालीचा उदासिन आहे.येथील शासकिय अधिकारी वर्गावर वचक ठेवून,सर्वसामान्य जनता जनार्दनाची किरकोळ कामे करून देणारा लोकप्रतिनिधी मिळत नसल्याने येथील मतदार पार वैतागला आहे.त्यामुळे येथील मतदार,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या विकासाकरीता,आमदार म्हणून एखाद्या सच्च्चा योजनामहर्षी-सहकार नेता-विकास पुरुषाची प्रतिक्षा करीत आहे. ; कारंजा शहर हे दत्तावतार गुरुमाऊली श्री नृसिह सरस्वती स्वामींचे जगप्रसिद्ध जन्मस्थान आहे.शक्तिपिठ श्री कामाक्षादेवीचे येथे पवित्र स्थान आहे.येथे जैन धर्मियांची सुप्रसिद्ध अशी पावन तिर्थक्षेत्रे,भ.महावीर मंदिर,श्री पद्मावती देवी मंदिर आहे. त्यामुळे या नगरीत संपूर्ण भारतातीलच नव्हे तर विदेशातील यात्रेकरूची वर्दळ असते.त्यामुळे ही गोष्ट हेरून येथील “तिर्थक्षेत्र विकास आराखडा” तयार करून, तिर्थक्षेत्र विकास आराखडा निधी मिळवून,श्रीक्षेत्र शेगाव पंढरपूरच्या धर्तीवर विकास केला तर त्यामधून हजारो बेरोजगारांना येथे व्यवसायामधून रोजगार उपलब्ध होऊ शकतो.मतदार संघातील “सोहळ काळवीट अभयारण्याची” रखडलेला कामे पूर्ण करण्यासाठी पर्यटन विकास निधी मिळवून,सोहळ काळवीट अभयारण्य जर,ताडोबा वाघ्र अभयारण्याच्या धर्तीवर, पर्यटकांसाठी खुले करण्यात आले तर येथील ग्रामिण भागातील हजारो ग्रामस्थांना व्यवसायातून स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकतो.तेव्हा अशाप्रकारे कारंजा मतदार संघाचा विकास हे बाहेरगावचे नवखे पाहुणे उमेद्वार करणार काय ? हाच माझा खरा प्रश्न आहे. असे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी म्हटले आहे. तसेच विकासाबद्दल स्टॅम्पपेपरवर वचननामा लिहून, बाहेरगावचा एखादा पाहुणा भावी आमदार कारंजा मानोरा मतदार संघाच्या विकासाची हमी घेणार काय ? की फक्त कारंजा मानोरा मतदार संघाला आपली जहाँगीर समजून येथील आमदारकीवर स्वस्वार्थासाठी वाईट नजरच ठेवणार ! असे भाष्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केले आहे.