रमाकांत आचरेकर यांच्या जयंती दिनानिमित्त……….

खेळ

एक काळ क्रिकेट विश्वात नाव गाजवलेल्या या दोन्ही व्यक्तिमत्वात मोठी तफावत जाणवून आली. थरथरत्या अंगाने, प्रचंड इच्छाशक्ती गमावलेला, बोलताना अडखळणाऱ्या विनोद कांबळीला पाहून सगळेचजण गहिवरले. या मित्राची भेट घेण्यासाठी सचिन मात्र पुढे सरसावला, त्याच्या हातात हात दिला…पण मध्येच त्यांना थांबवून सचिनला त्याच्या जागेवर बसण्यास सांगून कार्यक्रम पुढे नेण्यात आला. यावेळी गडबडलेला विनोद कांबळी “सर जो तेरा चकराए, या दिल डुबा जाये, आजा प्यारे पास हमारे, काही घबराए…”गाणं म्हणत स्वतःच घाबरलेला जाणवला. अर्थात ही भेट घडून आली ती . काल पडलेल्या या सोहळ्यात रमाकांत आचरेकर यांचे विद्यार्थी मंचावर उपस्थित होते. त्यात ही दोन व्यक्तिमत्व आवर्जून हजेरी लावताना दिसले. ह्या दोघांकडे पाहून एक मराठी गाणं पटकन आठवलं … तुझी माझी. हां माझी तुझी. आणि माझी. ही दोस्ती तुटायची नाय. ही दोस्ती तुटायची नाय. अरे सुटेल का रे हात दोस्तीचा. नाय नाय नाय नाय. नाय नाय नाय नाय. तुटेल का रे वादा यारा. नाय नाय नाय नाय. नाय नाय नाय नाय