श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय- लेखक :: प्रा.के. वि. बेलसरे, या ग्रंथाच्या आधारे
भाग :196: गोंदवल्यास पुनरागमन चार आठ दिवस गेले असतील किंवा नसतील इतक्यांत कुरवलीचे दामोदरबुवा गोंदवल्यास आले. बुवांनी कुरवलीला मोठे राममंदिर बांधलें होतें. श्रीमहाराजांनी एकदां येऊन मंदिर पहावें ही त्यांची व कुरवलीच्या लोकांची फार इच्छा होती म्हणून बुवा आमंत्रण करण्यास आले होते. ‘अनायासै श्रीशंकराचे देखील दर्शन घडेल, चला आपण जाऊन येऊ.’ असे म्हणून श्रीमहाराज कुरवलीला गेले. […]
वाचन सुरू ठेवा